म्हैशाळ एम येथे चिमुकल्यांनी भरवला संक्रातीसणाचा आठवडा बाजार
सांगली न्यूज
कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हैशाळ एम या शाळेतील विद्यार्थ्यांनी मकर संक्रांत सणाचा आठवडा बाजार भरवला गावचे सरपंच मा . शहाजी (भाऊ) एडके , उपसरपंच रोहिणी ताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मकर संक्रांतीचा बाजार भरवण्यात आला ,या बाजारामध्ये भाजीपाला, संक्रांतीच्या सणाचे साहित्य आदी, आठवडाबाजारा मध्ये या चिमुकल्यांनी विक्री केली, गावातील ग्रामस्थांनी महिलांनी मोठी गर्दी हा बाजार पाहण्यासाठी केली. आनंद आणि उत्साहाने
या चिमुकल्यांकडून साहित्य, भाजीपाला,भोगी , खरेदी केली. शाळेचे मुख्याध्यापक फड सर, आणि सर्व शिक्षक , शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली हा आठवडा बाजार चिमुकल्यांनी भरवला होता

