सयाजी शिंदे : साताऱ्यात वॉचमनची नोकरी, टॉलीवूडचा ‘डॅशिंग व्हिलन’ ते सह्याद्रीला आपलंस करणारा वृक्षप्रेमी अभिनेता
सांगली न्यूज
अभिनयाबरोबर सामाजिक भान जपणारे अन् सह्याद्रीला देवराई बनवणारे सयाजी शिंदे
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा वाढदिवस
साताऱ्याच्या सामान्य कुटुंबातील मुलगा हैदराबादमध्ये पोहोचला अन् बघता बघता टॉलीवूडमध्ये सुपरस्टार झाला. दक्षिणेतील काही दिग्दर्शकांना ते लकी वाटतात, तर काही निर्मात्यांचे चित्रपट त्यांचं कास्टिंग झाल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. टीव्हीवर लागणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या मराठी माणसाला पाहिल्यावर एक वेगळाच अभिमान वाटतो. कन्नड, मल्लाळम या सिनेमांमधील खलनायकांची नावे आठवायची झाली तर एकच ‘कॉमन’ नाव समोर येईल ते म्हणजे सयाजी शिंदे. साधी राहणी, दमदार अभिनय, पिळदार मिशा आणि चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन फिरणारा हा व्हिलन प्रत्येकाला भावतो. सिनेमाकडे प्रेम म्हणून नाहीतर श्रद्धा म्हणून पाहणारे सर्वांचे लाडके सयाजी शिंदे यांचा आज ६५ वा वाढदिवस.
