yuva MAharashtra कवठे महांकाळ विकास सोसायटीच्या सभासदांना १५% लाभांश वाटप

कवठे महांकाळ विकास सोसायटीच्या सभासदांना १५% लाभांश वाटप

Admin
0





सांगली न्यूज डिजिटल

कवठेमहांकाळ/ प्रतिनिधी

21/10/2024


कवठे महांकाळ : कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या आणि सभासदांचे हित जोपासणारी संस्था अशी ओळख निर्माण केलेल्या कवठे महांकाळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या सभागृहात महांकाली शेतकरी भवन येथे सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सभासदांना १५% लाभांश वाटप करण्यात आले.
   केवळ आर्थिक उलाढाल हा दृष्टीकोन न ठेवता कवठे महांकाळ विकास सोसायटी कवठे महांकाळ शहरातील तसेच तालुक्यातील विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असते.विविध उपक्रम राबवत असते.यावेळी बोलताना विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील म्हणाले,संचालक,सभासद आणि तालुक्यातील नागरिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यातूनच आम्हाला बळ मिळत आहे.या सहकार्याच्या जोरावर आम्ही व सर्व संचालक सोसायटीला विकासाच्या उंची पर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
   याप्रसंगी व्हा.चेअरमन काकासो बंडगर,माजी चेअरमन दिलीप झुरे,माजी व्हा.चेअरमन दत्तात्रय सूर्यवंशी,माजी नगरसेवक सुनील माळी,तज्ञ संचालक पंडित दळवी,तुकाराम आबा पाटील तसेच इतर सोसायटीचे संचालक उपस्थित होते.लाभांश वाटपाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सचिव विजय सूर्यवंशी,क्लार्क सिध्देश्वर पाटील,वैभव पाटील,अजय पाटील,शिपाई प्रशांत पाटील यांनी परिश्रम घेतले.ऐन दिवाळीच्या तोंडावर १५% लाभांश मिळाल्याने सभासदांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top