सांगली न्यूज डिजिटल
कवठेमहांकाळ दि. २६. ११. २०२४- तालुका विधी सेवा समिती कवठेमहांकाळ, कावठेमहांकाळ तालुका वकील संघटना आणि शहिद सुरेश चव्हाण हायस्कूल, करोली (टी )यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद सुरेश चव्हाण हायस्कूलच्या भव्य पटांगणावर संविधान दिन संपन्न झाला,यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. टी.डी. पाटील यांनी प्रास्ताविक भाषण करून विदयार्थाना संविधान दिनाबाबत माहिती सांगून संविधानाचे पवित्र्य जपण्याचे आवाहन केले, तसेच ॲड सतीश पाटोळे, अँड अमोल क्षीरसागर, अँड अनिल पाटील यांनीही उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ अँड एच. ए. पवार, वकील संघटनेचे सचिव अँड.एस. के. चव्हाण, मुख्याध्यापाक बारामते सर व इतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.