कोंगनोळी, ता.कवठेमहांकाळ येथे महाराष्ट्रीयन बेंदुर (बैलपोळा) सण उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांचा आवडीचा सण म्हणून बेंदुर सणाची ओळख आहे, या दिवशी शेतकऱ्यांनी आपली जनावरे व बैलांना आंघोळ घालून रंगवून, नवीन कंडे, कासरे, म्होरक्या घालून सजवले होते. परंपरे प्रमाणे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या बैलांची व त्यानंतर बाळासाहेब महादेव पाटील यांच्या बैल जोडीची रखवालदार व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांच्या बैल जोडींची ही मिरवणूक काढण्यात आल्या.
गावातील शेतकरी गणपती रुपनुर यांच्या मालकीच्या बैल जोडिंची कर तोडण्यासाठी निवडली होती, या बैलांच्या शिंगाला चौऱ्या घातल्या होत्या, एका बैलाला हिरमुज लावून तांबडे केले होते तर एक बैल पांढरा च ठेवला होता. दोन्ही बैलांना सोसायटी पासून सावकार वाड्या पर्यंत करी साठीचा मार्ग होता, लिंबाचे डहाळे व खोबऱ्याची वाटी बांधलेली कर मारुतीच्या मंदिरापासून जीप शाळे पर्यंत धरली होती. एकदम अटीतटीच्या झालेल्या करीच्या सोहळ्यात तांबड्या बैलाने कर तोडली, तांबड्या बैलाने कर तोडली तर बाजरी पिकते व पांढरा बैलाने कर तोडली तर शाळू मोठ्या प्रमाणात पिकते अशी पारंपारिक अख्यायिका आहे. ही कर पाहण्यासाठी गावातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी सरपंच भूपाल पाटील, उपसरपंच गणपतराव साळुंखे, पोलीस पाटील सौ सुवर्णा बाळासाहेब पाटील, सोसायटीचे चेअरमन राजाराम बंडगर, सुरेश बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कांबळे, केपी पाटील सर, शिवाजी जाधव सर, हणमंतराव पाटील, संभाजीराव पाटील,अमीर मुजावर, दत्ता बापू माने, संजय पाटील, राजू पोतदार, टी एम खोत, विठ्ठल खोत, कॅप्टन गवस मुजावर, बापू लिगाडे, गणपती हाक्के, राजू पाटील, संजय मोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोंगनोळीत बेंदुर सण उत्साहात साजरा*
July 21, 2024
0
Share to other apps