yuva MAharashtra श्री लक्ष्मीदेवी माध्यमिक विद्यालय खलाटी ची पर्यावरण पूरक वृक्षदिंडी

श्री लक्ष्मीदेवी माध्यमिक विद्यालय खलाटी ची पर्यावरण पूरक वृक्षदिंडी

Admin
0




 डफळापुर दि 19 खलाटी तालुका जत येथील श्री लक्ष्मी देवी माध्यमिक विद्यालय खलाटीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक वृक्षदिंडी काढली .
      अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमध्ये झालेला असताना लक्ष्मीदेवी विद्यालयाच्या वतीने पर्यावरणाचा संदेश देत पालखीमध्ये विठ्ठल मूर्तीसोबत झाडे व ग्रंथ ठेवून लोकांना झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत व ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत संपूर्ण खलाटी गावातून दिंडी काढण्यात आली .सुरवातीस शाळेपासून टाळ मृदंग च्या गजरात वारकऱ्यांच्या वेशात,पालखीच्या पुढे लेझीम खेळणाऱ्या मुली व मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जप करणारी विद्यार्थी यांच्या यांनी मोठ्या उत्साहात गावातून दिंडी काढली .या दिंडीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटीच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला विठ्ठल रुक्मिणी च्या रूपात व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने दिंडीत सहभागी झाले होते. फेरी काढताना घरासमोर दिंडी गेल्यानंतर ग्रामस्थांनी मुलांच्या पायावर पाणी घालून त्यांची पूजा करण्यात आली दिंडीच्या शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटीच्या भव्य अशा पटांगणावर रिंगण सोहळा पार पडला. यावेळी बाल वारकऱ्यांनी फुगडी व लेझीमचा आनंद घेतला. दिंडीचे नियोजन उपक्रमशील शिक्षक शिवाजी ओलेकर,पांडुरंग लवटे , संजय सर्जे,गूळदगडे मॅडम,सुहास पाटील,वैभव अंबरे यानी केले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिंडीचे नियोजन कोळेकर सर, जानकर सर,माळी सर व जाईबाई सर यांनी केले.. 
यावेळी ग्रामस्थ,शाळा समितीचे अध्यक्ष,ग्रामपंचायत कमिटी व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top