yuva MAharashtra अदानी-अंबानी नव्हे, हा व्यक्ती करतो सर्वात जास्त दान, वाचा भारतातील दानशूर लोकांची यादी

अदानी-अंबानी नव्हे, हा व्यक्ती करतो सर्वात जास्त दान, वाचा भारतातील दानशूर लोकांची यादी

Admin
0


 

द जनसत्ता न्यूज 

भारतातील सर्वात दानशूर लोकांची यादी समोर आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आहेत, मात्र दान करण्याच्या बाबतीत या दोघांच्याही पुढे एक व्यक्ती आहे.


भारतीय संस्कृतीत दान करणे हे शुभ मानले जाते. आपल्यापैकी अनेकजण आपल्या ऐपतीप्रमाणे दान करत असतात. अशातच आता भारतातील सर्वात दानशूर लोकांची यादी समोर आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आहेत, मात्र दान करण्याच्या बाबतीत या दोघांच्याही पुढे एक व्यक्ती आहे. भारतातील आघाडीच्या श्रीमंत लोकांनी २०२५ मध्ये आतापर्यंत १०३८० कोटी रूपयांचे दान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


*◼️शिव नाडर*

भारतातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. नाडर कुटुंबाने २०२५ मध्ये एकूण २७०८ कोटी रुपयांचे दान दिले आहे. ते गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती बनले आहेत. ते दररोज सरासरी ७.४ कोटी रुपयांचे दान देतात. शिव नाडर यांची देणगी रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी वाढली आहे.


*◼️टॉप १० दानशूर व्यक्ती*


*१. शिव नाडर आणि कुटुंब* (एचसीएल टेक्नॉलॉजीज)

• दान केलेली रक्कम- २७०८ कोटी रूपये.

• ही देणगी शिव नाडर फाउंडेशनद्वारे शिक्षण आणि कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी देण्यात आली आहे.


*२. मुकेश अंबानी आणि कुटुंब* (रिलायन्स फाउंडेशन)

• दान केलेली रक्कम - ६२६ कोटी 

• शिक्षण, ग्रामीण परिवर्तन, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि वारसा संवर्धनासाठी दान


*३. बजाज कुटुंब (जमनालाल कनिराम बजाज ट्रस्ट, कमलनयन बजाज फाउंडेशन)*

• दान केलेली रक्कम - ४४६ कोटी 

• ग्रामीण भारतातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी रक्कम दान


*४. कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब (आदित्य बिर्ला ग्रुप)*

• दान केलेली रक्कम - ४४० कोटी 

• शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रासाठी दान


*५.गौतम अदानी आणि कुटुंब (अदानी फाउंडेशन)*

• दान केलेली रक्कम - ३८६ कोटी 

• शिक्षण, कौशल्य विकास, सामुदायिक आरोग्य कार्यक्रमासाठी दान


*६. नंदन नीलेकाणी*

• दान केलेली रक्कम - ३६५ कोटी 

• सार्वजनिक सेवांमध्ये नवोपक्रम आणि सामाजिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी दान 


*७. हिंदुजा कुटुंब (हिंदुजा फाउंडेशन)*

• दान केलेली रक्कम - २९८ कोटी

• आरोग्य, शिक्षणासाठी दान


*८. रोहिणी नीलेकणी (एकस्टेप फाउंडेशन)*

• दान केलेली रक्कम - ₹ २०४ कोटी

• शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी दान


*९. सुधीर आणि समीर मेहता(UNM फाउंडेशन)*

• दान केलेली रक्कम - १८९ कोटी 

• आरोग्य, ग्रामीण विकास आणि शिक्षणासाठी दान 


*१०. सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला फाउंडेशन)*

• दान केलेली रक्कम - १७३ कोटी 

• शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी दान

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top